परंडा (प्रतिनिधी)- बानगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते भाऊसाहेब खरसडे यांची धाराशिव जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी निवड झाल्याबद्दल परंडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील शासकीय विश्राम गृह येथे सत्कार करून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲड. संदीप खोसे पाटील,नगर परिषद सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण समिती सभापती राहुल बनसोडे,शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, माजी नगराध्यक्ष नसीर शहावर्फीवाले ,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष नंदू शिंदे , राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते बाशा भाई आदी उपस्थित होते.
