परंडा (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद, धाराशिव च्या नवनिर्वाचित अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सदिच्छा भेट घेऊन भाजपा नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या सोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी ठाकूर यांनी अर्चनाताई पाटील यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस ॲड.गणेश खरसडे, तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, नगरसेवक अविनाश विधाते, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजित काकडे, विकास कुलकर्णी, किरण देशमुख, शहाजीआप्पा पाटील, हनुमंत पाटील, शिवाजीराव पाटील, बाबासाहेब जाधव, श्रीराम देवकर, भागवत खोत, निशिकांत क्षिरसागर, तुषार नेटके, प्रमोद लिमकर, हरीदास शिंदे, ब्रम्हदेव उपासे, एकनाथ वायसे, अरुण करळे, इसुब पठाण, रणजित मिस्कीन, अभिषेक चोबे, धनंजय काळे, अजिम हन्नुरे, गौरव पाटील, रामकृष्ण घोडके, सुरज काळे, समाधान कोळेकर, मिलिंद शिंदे महिला मोर्चा तालुकाध्यक्षा प्रियांका क्षीरसागर, नुतनताई खोसरे, शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, गायत्रीकाकी तिवारी, शुभदा शेलार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
