धाराशिव (प्रतिनिधी)- शिंगोली येथील सरस्वती विद्यालयाने 2026 सालच्या ‌‘आय एम विनर‌’ स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी केंद्र तसेच तालुका स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.

इयत्ता पहिलीतील दुर्वा शितोळे हिने केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तर उजेर पठाण द्वितीय, समृद्धी पवार तृतीय आणि ऋषिकेश घोंगडे चौथ्या क्रमांकावर राहिला. इयत्ता दुसरीमध्ये आराध्या भोसले प्रथम, अर्णव पवार व ओम पवार द्वितीय, तसेच तृप्ती लामकाने चौथ्या क्रमांकावर झळकली. याच गटातील शौर्य पडवळ पाचवा, अविराज खांडवे सहावा आणि शर्वरी मुळे सहाव्या  क्रमांकावर  सिफा मुजावर पाचव्या  क्रमांकावर यशस्वी ठरले.

इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी करताना जगजीत निंबाळकर तिसरा, विश्वजीत निंबाळकर प्रथम, शिवेंद्र पडवळ व प्रथमेश घोगरे चौथ्या, रुद्र घोंगडे पाचवा, वेदांत घोगरे सातवा तसेच श्रुती निंबाळकर पाचव्या क्रमांकावर  हर्षद घोगरे सहाव्या क्रमांकावर यश मिळवले. इयत्ता चौथीमध्ये प्रत्युष रणखांब प्रथम, सुबोध शिंगारे द्वितीय, अनुराग वीर चौथा, अथर्व जंगम सहावा आणि स्वरा निंबाळकर सातवा क्रमांक पटकावण्यात यशस्वी झाले. इयत्ता पाचवीमध्ये श्रुती शिंदे प्रथम, ओम पोळ द्वितीय, प्रणित  जगताप तृतीय, श्रेया खुणे चौथी आणि राहुल पडवळ पाचवा क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम राखली.

या सर्व विद्यार्थ्यांना सारिका गाढवे, अश्विनी लबडे, मनीषा शिंगारे, सुलताना पठाण व कोंढारे मॅडम यांनी परिश्रमपूर्वक मार्गदर्शन केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक व संस्थापक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top