तुळजापूर (प्रतिनिधी)- खंडाळा (तुळजापूर) येथिल 350 वर्षांपूर्वीपासून चालत आलेली ऐतिहासिक परंपरा असलेल्या मानाच्या कावडींचे शिखर शिंगणापुर येथुन श्री शंभु महादेवाचे दर्शन करुन परतीच्या मार्गावर श्रीतुळजाभवानी मंदिरामध्ये आगमन झाले. यावेळी छञपती शिवाजी महाराजांच्या वंशज श्रीमंत कल्पणाराजे भोसले यांच्या वतिने शंभुमहादेव देवस्थानकडुन पाठविण्यात आलेल्या मानाच्या (साडीचोळी-महावस्त्र, विभुती, दवणागोळी) असा आहेर आई तुळजाभवानीला अर्पण करण्यात आला.
यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतिने देवीजींचे मुख्य मंहत श्री वाकोजी बुवा, मुख्य पुजारी धनंजय कदम-पाटिल यांनी हा आहेर स्विकारला. शिखर शिंगणापुरला जाताना सदर कावडी श्री तुळजाभवानी मंदिराच्या वतिने शंभु महादेवाकरीता मानाचा फेटा, धोतर, शाल, कुंकु असा आहेर नेत असतात. मानाच्या कावडी मंदिरात येताच हालगी झांझेच्या निनादाने मंदिर परीसर दणानुन गेला.. कावडींच्या दर्शना करीता भाविकांनी गर्दी केली होती यावेळी उपस्थित मंदिर संस्थानचे प्रतिनिधी व कावडीच्या वतिने सुधाकर पवार, अशोक पवार, महादेव कुंभार, पियुष पवार, संतोष काकडे, दत्ता पवार,माणिकदादा पवार, स्वराज लोखंडे, नाना पवार, ज्ञानेश्वर मोरे, कोकाटे, रावण कोकाटे, संजय जाधव, श्रीमंत पवार, मनमथ धुमाळ, आदी उपस्थित होते.
