धाराशिव (प्रतिनिधी)-  बालसाहित्याच्या संशोधनामुळे मुलांच्या भावनिक व नैतिक विकासाला चालना मिळते असे प्रतिपादन डॉ. अशोक मर्डे यांनी केले.  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात हिंदी संशोधन विभागाच्या वतीने प्रा. अनिता प्रदीप तोमर यांचा गोविंद शर्माच्या बाल साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर आधारित पीएचडीची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पूर्वी मौखिकी आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी डॉ. मर्डे बोलत होते.

प्रारंभी अनिता तोमर यांनी आपल्या विषयासंबंधी विस्तारीत स्वरुपाची माहिती दिली. डॉ.मर्डे पुढे म्हणाले की, गोविंद शर्मा यांच्या साहित्यातुन समाजाला नैतिक संदेश प्राप्त होतो.  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या हिंदी भाषेच्या संशोधन केंद्रातुन आजतागायत अनेक समाजोपयोगी विषयांवर आधारित संशोधकांनी पीएचडीच्या माध्यमातून आपले विषय समाजासमोर मांडले आहेत.  

सदर प्रसंगी बहिस्थ परीक्षक डॉ.राजेंद्र वडजे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ सोलापूर, स्थानिक परीक्षक डॉ विनोदकुमार वायचळ, वरीष्ठ साहित्यिक डॉ देविदास इंगळे, हिंदी विभाग प्रमुख डॉ केशव क्षीरसागर, माजी प्राचार्य डॉ मुकुंद गायकवाड, प्रा स्वाती देडे, प्रा रमा ओहाळ, प्रा सुवर्णा गेंंगजे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. तर आभार प्रा विवेकानंद चव्हाण यांनी मानले.

 
Top