परंडा (प्रतिनिधी)-  बिलाच्या कारणावरून हॉटेलची तोडफोड करून रोख रक्कम व सोन्याची चेन पळवल्याची घटना तालुक्यातील मौजे इडा येथे घडली.या घटनेत हॉटेल चालकाला जबर मारहाण करण्यात आली असून उपचारासाठी धाराशिव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार मौजे इडा येथील हॉटेल 7/12 (सातबारा) मध्ये मालक आणि जेवण्यासाठी आलेल्या लोकामध्ये वाद झाला होता. थोड्या वेळानंतर सात ते आठ जमावाने सदर हॉटेलवर हल्ला केला. हॉटेलचालकास लोखंडी गज व खुर्चीने मारहाण करून जमावाने हॉटेलमधील सामानाची नासधूस केली. जखमी हॉटेल चालकाच्या गळ्यातील चैन व रोख रक्कम घेऊन पसार झाले. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धाराशिव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जख्मी मध्ये प्रमोद कचरू भोसले, निलेश गणपती बोकेफोडे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.या प्रकरणी परंडा पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास परंडा पोलीस करीत आहे.

 
Top