धाराशिव (प्रतिनिधी)- कोरोना काळापासून अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. शिक्षणापासून विद्यार्थी उदासीन झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा तासिकेला आणि विविध उपक्रम व कार्यक्रमांना खूप मोठा प्रतिसाद असल्याचे दिसून येते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी अनेक मार्गांचा अवलंब करून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवून सर्व तासिका पूर्ण कशा होतील याकडे लक्ष दिले आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे उपक्रम महाविद्यालय मध्ये प्रभावीपणे राबवलेले आहेत. चॅट जीपीटी, ए.आय कार्यशाळा, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्यावरील कार्यशाळा, अशा विविध कार्यशाळा विद्यापीठ स्तरावरील मंजूर करून त्या प्रभावीपणे राबवलेल्या आहेत. महाविद्यालयामध्ये दत्तक योजना प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे आणि त्यांच्या करिअरसाठी उपयुक्त असणारे सर्व उपक्रम राबवण्यावर मोठा भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होण्यासाठी कनिष्ठ विभागातील अकॅडमी असेल, शैक्षणिक सहल असेल, पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करणे ,विद्यार्थ्यांच्या तासिका होत आहेत की नाही यावर काटेकोरपणे लक्ष ठेवणे असेल,कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून आणि एबीसी सवलतीपासून वंचित राहणार नाही. महाविद्यालयामध्ये आल्यानंतर तो रिकाम्या हाताने घरी परत जाणार नाही यासाठी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी खूप मोठे प्रयत्न केले आहेत. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालय विद्यार्थ्यांनी गजबजुन गेल्याचे दिसते. प्रत्येक उपक्रमात विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने भाग घेताना दिसतात. अशा अनेक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
