धाराशिव (प्रतिनिधी) मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या सूचनांनुसार संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.

या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा),सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे,अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या 247 हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

आपत्कालीन संपर्क तपशील

SEOC (24x7)

राज्य आपत्कालीन परिस्थिती किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षेबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी खालील SEOC क्रमांकावर संपर्क साधावा:

टोल फ्री क्र.1077

फोन नं. +91-9321587143

कार्यालयीन क्र.022-22027990

ई-मेल आयडी: controlroom@gov.in

संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील

रामल्लाह (पॅलेस्टाईन)

फोन: +970592916418

ईमेल:  repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in 

दोहा (कतार)

फोन: 00974-55647502

ईमेल: cons.doha@mea.gov.in 

रियाध (सौदी अरेबिया)

फोन: 00-966-11-4884697

: 00-967-542126748

टोल फ्री: 800 247 1234

ईमेल:  cw.riyadh@mea.gov.in 

तेल अवीव (इस्रायल)

फोन: +972-54-7520711 / +972-54-2428378

ईमेल:  conal.telaviv@mea.gov.in 

तेहरान (इराण)

फोन: +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)

टोल फ्री: 800-46342

: +971543090571

ईमेल:  pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in 

कुवैत

फोन: 96565501946

ईमेल: community.kuwait@mea.gov.in 

बाहरीन

फोन: 00973-39418071

मस्कत

टोल फ्री: 80071234

: +96898282270

ईमेल: cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in 

जॉर्डन

फोन: 00962-770 422 276

बगदाद (इराक)

फोन: +964 771 651 1185 / +964 7704444899

वेबसाइट: coibaghdad.gov.in 

ईमेल:  cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in असे आहेत.

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी.भारतीय दूतावास/कॉन्सुलेटच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.आपले लोकेशन व स्थिती कुटुंबियांना सतत कळवावी.मोबाईल चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.सोशल मीडियावर अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये.स्थानिक भारतीय दूतावासाकडे नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.


जिल्ह्यातील नागरिकांसाठी सूचना

उपरोक्त देशांमध्ये आपले नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्ती अडकून पडलेले असतील तर त्यांची माहिती धाराशिव प्रशासनास खालील क्रमांकांवर संपर्क साधून द्यावी.अडकलेल्या नातेवाईकांशी संपर्क झाला असल्यास त्यांना कोणत्या मदतीची आवश्यकता आहे याबाबत जिल्हा प्रशासनास कळवावे.ज्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकत नाही, त्यांची माहिती प्रशासनास सविस्तरपणे देण्यात यावी,असे आवाहन करण्यात येत आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष:

02472- 224366, 02472-225618.

टोल फ्री क्रमांक :1077

धाराशिव पोलीस नियंत्रण कक्ष:

02472-222900,

02472-222700

निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव: 7588938686, तहसीलदार तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,धाराशिव: 9423339192, उपविभागीय अधिकारी,धाराशिव: 7083663139, उपविभागीय अधिकारी,उमरगा: 9850897042, उपविभागीय अधिकारी,कळंब: 9922447812, उपविभागीय अधिकारी,भूम: 9566096691, तहसीलदार धाराशिव: 9657576714, तहसीलदार तुळजापूर : 7776889999, तहसीलदार उमरगा : 9422469013

तहसीलदार लोहारा : 7875243834, तहसीलदार कळंब : 9881745577, तहसीलदार वाशी: 9096255737, तहसीलदार भूम: 9823722274, तहसीलदार परंडा: 8208513656, वरील क्रमांकांवर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव यांनी दिली.

 
Top