उमरगा (प्रतिनिधी)-  तालुक्यातील मुळजचे ग्रामदैवत श्री जटाशंकर यात्रा महोत्सवानिमित्त गुरुवारी, (दि 19) गुढीपाडव्या दिवशी सोयराप्पा परिवाराच्या श्रीच्या काठीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. तर महादेवाच्या कावडीची दुपारी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. कावड दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व सामाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुक्यातील मुळज येथे सीमावर्ती भागातील भाविकांचे श्रद्धास्थान व प्राचीन उत्कृष्ट शिल्प कलेचा उत्तम नमुना असलेले श्री जटाशंकर हेमाडपंती मंदिर आहे. मंदिरात परिसरात विविध देवदेवताच्या मुर्ती आहेत. दर वर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवारी सकाळी गुढीपाडव्या दिवशी सोयराप्पा घराण्यातील श्री च्या काठीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी तानाजी बिराजदार, व्यंकट बिराजदार, नागेश बिराजदार, तात्याराव बिराजदार, शिवाजी बिराजदार, पंढरी बिराजदार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, व्हाईस चेअरमन सतिश जाधव, धैर्यशील चालुक्य, ग्रा पं सदस्य मोहीत चालुक्य, विष्णू बिराजदार आदी उपस्थित होते.


 
Top