धाराशिव (प्रतिनिधी)-  धनेश्वरी बोरगाव (ता. कळंब) येथील सुमनताई त्र्यंबकराव पाटील यांचे आज अल्पशा आजाराने वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या ज्येष्ठ भगिनी होत. तसेच धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील आणि परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या त्या चुलती होत. कै. सुमनताई या प्रेमळ स्वभावाच्या, कुटुंबवत्सल व संस्कारशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या निधनाने पाटील परिवारावर तसेच धनेश्वरी बोरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर धनेश्वरी बोरगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top