धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात क्रांतीवीर फकिरा राघोजी साठे यांच्या जयंतीनिमित्त दि. 1 मार्च 2026 रोजी मातंग समाज स्मशानभूमी येथे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मातंग समाज व धाराशिव नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम पार पडली.

या उपक्रमासाठी दत्ता पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजबांधवांनी मोठ्या उत्साहात श्रमदान केले. स्मशानभूमी परिसरातील गवत, कचरा व साचलेली घाण काढून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. नगरपरिषदेच्या वतीने दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन तसेच महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. उप मुख्याधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे यांनी आवश्यक कर्मचारी व यंत्रसामग्री उपलब्ध करून देत मोहिमेला गती दिली. या अभियानाच्या यशस्वितेसाठी सुमेध क्षीरसागर, संतोष पेठे, संतोष शेरा पेठे, सचिन पेठे, अंकुश पेठे, नेताजी क्षीरसागर, पप्पू पेठे, सचिन वाघमारे, जय पेठे, वैभव पेठे, अलोक पेठे, ज्ञानेश्वर पेठे, एडके पेठे, कालिदास चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top