धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज लेडीज क्लब, धाराशिव येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन शैलेश ब्रम्हे,न्यायमूर्ती,मुंबई उच्च न्यायालय यांच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायाधीश यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव होत्या.

महाशिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग,(वार रूम  मध्यवर्ती नियंत्रण कक्ष),जिल्हा वाहतूक शाखा पोलीस विभाग,राज्य मार्ग परिवहन महामंडळ,उपविभागीय अधिकारी कार्यालय,जिल्हा कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, आरोग्य विभागाचा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, मोबाईल मेडिकल हॉस्पिटल, आयुष्मान भारत, ॲनिमियामुक्त भारत अभियान, रेशीम विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ,जिल्हा उद्योग केंद्र, महिला व बाल विकास विभाग, महिला बालकल्याण विभाग,पशुसंवर्धन विभाग यांसह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत वंचित, गरजू,महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर दुर्बल घटकांपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवून “सर्वांसाठी न्याय” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा या उपक्रमामागील मूलभूत हेतू होता.

 
Top