तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरात नाल्या तुंबल्या असून दुर्गंधी पसरली आहे त्या नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अंथरलेल्या पाईपलाईनवरील वाल्व्हच्या माध्यमातून ते दूषित पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरवठा केले जात आहे. दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शहरातील पसरलेली अस्वच्छता तात्काळ हटवून स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यात यावे यांसह इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्यावतीने तुळजापूर नगर परिषदेसमोर दि.20 मार्च रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले असून त्या मानण्यांचा गांभीर्याने विचार करुन तात्काळ मार्गी लावाव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
तुळजापूर शहरातील नागरिकांना नळाद्वारे पुरविण्यात येत असलेल्या पाण्याचा रंग आणि वास बदलेला असून दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे दूषित पाण्याची लॅब तपासणी करून अहवाल प्रसार माध्यमावर जाहीर करण्यात यावा. नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा. तर कचरा नियमीत उचलला जात नाही. रस्त्यांची व गटारांची साफसफाई होत नसल्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. घंटागाडी नियमितपणे येत नाही. त्यामुळे दोषी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी हे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे नगरसेवक अमोल कुतवळ, आनंद जगताप, रणजीत इंगळे, अक्षय कदम, प्रगती लोंढे, रवींद्र इंगळे, गणपत कदम, नागनाथ भांजी, बालाजी तट, अफसर शेख, डी टी क्षिरसागर, युसूफ शेख, चंद्रकांत कदम, सोमनाथ भोजने, किरण यादव, श्रीकांत खंडागळे, योगेश खोतकरी, अर्जुन साळुंके, विजयकुमार नवले, लाल तांबोळी, नरेश पेंदे, संतोष पवार, अमर मगर, अजिंक्य दांडे, संदीप कदम, गोरक्षनाथ पवार, रवींद्र साळुंके, श्रीकांत धुमाळ, संतोष इंगळे, भरत जाधव, ओंकार लोंढे, प्रकाश पवार, गौरवकुमार बाबशेट्टी, राजेंद्र हाके, असिफ बागवान, प्रमोद चव्हाण, राजेंद्र कदम, ऋषिकेश मगर, अभिषेक सोंजी, आदित्य सोंजी, यश सोंजी, विनोद सोंजी, सुनील शिंदे, प्रवीण पंडित, चिन्मय मगर, एन व्ही इंगळे, मोहन पांढरे, रत्नदीप पाटील, गणेश इंगळे आदींसह इतरांच्या सह्या आहेत.
