धाराशिव (प्रतिनिधी)- वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे लवकरच पोस्ट ग्रॅज्युवेट अभ्यासक्रमास मान्यता मिळणार असून, त्या दृष्टीकोनातून नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या टीमने नुकतीच त्या दृष्टीकोनातून तपासणी करून उपयोगिता प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युवेटचा अभ्यास सुरू होणार आहे. 

धाराशिव येथे सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची नियमित तपासणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल व नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या समितीने करून एमबीबीएस अभ्यासक्रम चालू ठेवण्यास उपयोगिता प्रमाणपत्र दिल्यामुळे मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयाच्या यादी धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव येणार आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयात 19 विभाग असून, या 19 विभागातील पोस्ट ग्रॅज्युवेट अभ्यासक्रमाला मान्यता मिळणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ व सहयोगी प्राध्यापक यांची कमतरता भासत असल्यामुळे सोलापूर येथील कंत्राटी प्राध्यापक धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेमण्यात आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय सध्या परिपूर्ण झाले असून, दिल्ली येथील नॅशनल मेडिकल कौन्सिलची तपासणी झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युवेट अभ्यासक्रम सुरू होणार आहे. 


99 टक्के मान्यता 

धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युवेट अभ्यासक्रमासाठी नुकतेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व महाराष्ट्र शासन यांच्या पथकाने तपासणी केली असून, मान्यता प्राप्त महाविद्यालयाच्या यादीमध्ये धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव येईल. दोन्ही पथकाने केलेल्या तपासणीमध्ये 99 टक्के मान्यता मिळली आहे.  दिल्ली येथील नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या अंतिम तपासणीनंतर 19 विभागाच्या पोस्ट ग्रॅज्युवेट अभ्यासक्रमासाठी 92 जागेची मान्यता मिळेल असे वाटते. 

डॉ. शैलेंद्र चौहाण

डीन, वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव


 
Top