भूम (प्रतिनिधी)- सन 2024 -25  हे वर्ष  भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्याचे शासन निर्णयानुसार  जाहीर करण्यात आलेले आहे. शासनाने यासंबंधी वर्षभराचा कृती आराखडा  व वार्षिक वेळापत्रकानुसार संविधानाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याचे व त्यासंबंधी वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचे  सांगितले होते. परंतु या कार्यक्रमांची प्रत्येक ठिकाणी अंमलबजावणी होते किंवा नाही हे पाहण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये  भरारी पथकाची निर्मिती केलेली आहे. सदर भरारी पथकाने भेट दिली व वर्षभराच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. तसेच पुढील कार्यक्रमाची दिशा सांगितली. कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी नाही झाली तर संबंधित शाळा प्रमुखांवर कार्यवाही करण्याचे अधिकार आहेत असे सांगितले. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ राऊत तसेच तालुका अध्यक्ष श्याम पालके यांनी भेट देऊन संपूर्ण शासन निर्णयांची माहीती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते. यावेळी मान्यवरांचा बुके व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन पायघन यू. पी. यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top