भूम : राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान (टप्पा १) अंतर्गत पाथरुड (ता. भूम) येथे ग्रामपंचायत प्रांगणात दि. १४ मार्च २०२६ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ४२४ नागरिकांनी उपस्थिती लावत विविध शासकीय कामांसाठी अर्ज सादर केले.
शिबिरामध्ये नागरिकांकडून महसूल विभागाशी संबंधित विविध प्रकारचे अर्ज मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाले. त्यामध्ये सातबारा उतारा, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, वय-अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अल्पभूधारक व शेतकरी प्रमाणपत्र आदी सेवांसाठी अर्ज करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिबिरात डिजिटल 7/12 उताऱ्यासाठी 144 अर्ज, तर डिजिटल 8-अ साठी 116 अर्ज प्राप्त झाले. तसेच सातबारा उताऱ्यासाठी 12 अर्ज दाखल झाले.
प्रमाणपत्रांच्या बाबतीत उत्पन्न प्रमाणपत्रासाठी 27 अर्जांपैकी 5 अर्जांवर तत्काळ कार्यवाही, रहिवासी प्रमाणपत्रासाठी 8 अर्जांपैकी 9 मंजूर, तर उत्पन्न प्रमाणपत्रासाठी 34 अर्जांपैकी 21 अर्ज मंजूर करण्यात आले. याशिवाय जाती पडताळणी, वय-अधिवास, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र आदी अर्जही प्राप्त झाले.
शिबिरात सिंगल विंडो क्लिअरन्स प्रणालीअंतर्गत देखील विविध अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये ई-पीक पाहणीसाठी 7 अर्ज, पीक विम्यासाठी 12 अर्ज दाखल झाले.
इतर योजनांमध्ये शिधापत्रिका संदर्भात 6 अर्ज, संजय गांधी निराधार योजनेसाठी (UDID) 23 अर्जांपैकी 41 लाभार्थ्यांना मदत, आधार अद्ययावत 8, आयुष्मान भारत कार्डसाठी 26 अर्ज प्राप्त झाले.
याशिवाय 7/12 वर नोंदलेल्या झाडांची पडताळणी संदर्भातही 69 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 55 अर्जांवर कार्यवाही करण्यात आली.