उमरगा - उमरगा शहरातील लातूर-गुलबर्गा रोडवर असलेल्या श्री क्षेत्र बिरूदेव मंदिर देवस्थानात २१ मार्चपासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, बिरूदेव चरित्र वाचन सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे.


श्री क्षेत्र बिरूदेव मंदिर देवस्थानात सोहळ्याचे औचित्य साधून शनिवार (२१) पासून आयोजित सप्ताहात कलश पूजन अंकुश शिंदे, डॉ. एम. एस. मलंग, ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन सिद्रामप्पा चिंचोळे, डॉ. विक्रम जीवनगे, बिरूदेव ग्रंथ पूजन सुभाष आष्टगे, डॉ. किशोर घोडके, प्रा. सचिन शिंदे, तेज प्रकाश बपेल, गाथा पूजन शहाजी पाटील, अनिल बिराजदार, बिरूदेव कथा व्यासपीठाचे पूजन अश्लेष मोरे, डॉ. विजयकुमार बेडदुर्गे यांचे हस्ते होणार आहे.  


विठ्ठल महाराज श्रीनाथ मंदिर यांचे दररोज सायंकाळी चार ते पाच यावेळी श्री बिरूदेव चरित्र कथा सांगणार आहेत. दररोज सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ गाथा भजन, सायंकाळी सात वाजता हरिपाठ, रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन, रात्री बारा ते तीन हरिजागर तर पहाटे चार ते सहा काकडा होणार आहे. कीर्तनसेवेत शनिवारी (२१) हभप. अनिल महाराज जकनाळ, रविवारी (२२) हभप. अण्णासाहेब बोधले महाराज डिस्कळ, सोमवारी (२३) हभप. ज्योतीताई सोनवणे वैजापूर, मंगळवारी (२४) हभप. मारुती महाराज जाहूरकर, बुधवारी (दि. २५), हभप. माऊली महाराज शिंदगीकर, गुरुवारी (२६) हभप. रामनवमीनिमित्त सकाळी १० ते १२ नीलेश महाराज चव्हाण किल्लारी, तर रात्री हभप. गणेश महाराज सोनवणे निरपणा, यांची कीर्तनसेवा होणार आहे. शुक्रवारी (दि. २७) हभप. कुलदीप महाराज शिंदगीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. श्री बल्लू महाराज यांच्या मुरूड ते बिरूदेव मंदिर पायी दिंडीचे पाडव्यादिवशी आगमन होणार आहे. 


या यात्रा महोत्सवासाठी श्री क्षेत्र बिरुदेव देवस्थान, जय मल्हार युवा सेना संघटना, ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. या महोत्सवाला देवप्पा सूर्यवंशी, तात्याराव फडताळे, शिवराज गळाकाटे, डॉ. संदीप बनसोडे, अनिल उर्फ पप्पू सगर, डॉ. तानाजी बनसोडे, व्यंकट घाटे, गावडेताई, पितळे गुरुजी, देविदास बनसोडे गुरुजी, इंजिनियर बनसोडे, डॉ. विक्रम जीवनगे, डॉ. प्रभाकर उमरगा, लक्ष्मण पवार, राघवेंद्र गावडे, दोन बालू व एक जालू यांच्यासह बिरदेव देवस्थान भक्त परिवाराच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात येत आहे.

 
Top