भूम (प्रतिनिधी)-  तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. रामेश्वर शिवारात बिबट्यासदृश प्राण्याने शेळीला पकडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्यानंतर आता वारेवडगाव येथे गाईवर हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली होती.

ही घटना शेतकरी बाळासाहेब नलवडे यांच्या शेतात घडली असून हल्ल्यात गाईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. 3 मार्च) सायंकाळी 7 वाजून 10 सेकंदांनी वनविभागाच्या व  शेतकऱ्याच्या वतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. भूम शहरा पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर वारेवडगाव शिवारात बिबटयाने काल केलेली शिकार परत खायला आला वनविभाग शेतकऱ्यांनी वतीने लावण्यात आलेल्या कमेऱ्यात  कैद केला.बाळासाहेब नलवडे यांच्या गाईला लक्ष्य करताना बिबट्या कॅमेऱ्यात दिसून आला आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाला तत्काळ कळविण्यात आले. वन अधिकारी कुटे, वनपाल जाधवर व जगताप देशमुख आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाची टीम कार्यरत झाली असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. 


 
Top