धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर आणि तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट येवती संचलित व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय नेतृत्व विकास उद्बोधन शिबिरामध्ये बारीपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे येथील भाग्यविधाते पद्मश्री चैत्राम पवार यांनी शिबिरार्थी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना गावाच्या विकासाचे अनेक पैलू सांगून विकासाचे रहस्य उलगडले.
श्री चैत्राम पवार यांनी गावकऱ्यांना आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की वन खात्याच्या वेगवेगळे ऑनलाईन फॉर्म भरून विकास करता येऊ शकतो. पद्मश्री चैत्राम पवार यांनी ग्रामसभेच्या अधिकारामध्ये काय काय करता येऊ शकते त्याचाही उल्लेख केला. गावकऱ्यातील वृद्ध आणि तरुण लोकांनी चैत्राम पवार यांना विविध प्रश्न विचारून विविध शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले.गावकर येथे ठरवले तर अनेक अशक्य कामे करून गावाच्या परिसरातील सिंचनाच्या अनेक विहिरी पानवटे पुन्हा प्रवाहित करता येऊ शकतात तसेच त्यातून गावाची समृद्धी आणता येते.त्यामुळे ग्रामस्थांनी एकोप्याने गावाच्या विकासासाठी जलसंधारणाची कामे वृक्ष लागवड यासह विविध कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी सरपंच मोहराबाई आढाव यांनी सुद्धा अनेक रानभाज्यांच्या रेसिपीची माहिती सांगितली. सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विनोद कुमार वायचळ यांनी पद्मश्री श्री चैत्राम पवार यांचा परिचय करून दिला त्यानंतर कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक श्री डॉक्टर विनोद तुंगी यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन चैत्राम पवार यांचा सत्कार केला यावेळी अध्यक्ष स्थानी गडदेवदरीच्या प्रथम नागरिक सरपंच सौ मोहराबाई आढाव होत्या. याप्रसंगी चैत्राम पवार यांनी बारी पाडा येथे आदिवासी बंधूंमध्ये कशाप्रकारे स्वयंरोजगार निर्मिती केली यावर सविस्तर माहिती दिली मोहाच्या झाडापासून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाला शेतीची जोड दिल्यानंतर तेथील वनवासी आदिवासी शेतकरी जे पूर्वी नाशिक आणि गुजरात मध्ये शेत कामगार म्हणून जायचे त्या सर्वांना त्यांनी प्रत्येकी पाच एकर जमीन दोन गाय दोन बैल शेळ्या कोंबडी प्रदान केल्या आणि वनखात्याशी करार करून गावाच्या आसपास असलेल्या क्षेत्रांमध्ये सागवान आणि बांबूची शेती केली. यासाठी आवश्यक असणारे सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी शेकडो बंधारे बांधले हे सर्व बंधारे जलतज्ञ आणि स्टॉकहोम वॉटर पुरस्कार विजेते आदरणीय डॉक्टर माधवराव चितळे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी खूप प्रगती केली आज एक विकसित वनवासी गाव म्हणून बारीपाड्याचा अनेक पुरस्कार घेऊन देऊन सत्कार करण्यात येत आहे चैत्राम पवार हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी बँकॉक येथे गेले होते त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांचे सर्वात मोठे काम रानभाज्या संमेलन आणि स्पर्धा घेणे आहे याबद्दल त्यांना गेल्यावर्षी राष्ट्रपती द्रोपदीमुळे यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
