धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने धाराशिव शहर कार्याध्यक्षपदी तरुण व तडफदार कार्यकर्ता नरसिंह लक्ष्मण मेटकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाच्या मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली.
या वेळी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते नरसिंह मेटकरी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास पक्षातील विविध वरिष्ठ पदाधिकारी व नगरसेवक उपस्थिती लाभली.या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, गटनेते खलिफाभाई कुरेशी, शहरप्रमुख, नगरसेवक आयाज भाई शेख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे मेटकरी यांनी नमूद केले.नवीन जबाबदारी स्वीकारताना नरसिंग मेटकरी म्हणाले, पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. शहरातील संघटना अधिक बळकट करून प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्षविस्तारासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे.दरम्यान, मेटकरी यांच्या नियुक्तीमुळे धाराशिव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असून आगामी काळात पक्षविस्ताराला अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांकडून व्यक्त केला जात आहे.
%20%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80.jpg)