भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील ग्रामदैवत श्री.हनुमान जयंतीच्या अनुषंगाने येथील हनुमान मंदिरात दि.26 मार्च पासून प्रारंभ झाला. सप्ताहात वासुदेव शास्त्री महाराज,मंगेश महाराज देशमुख प्रसाद महाराज कुलकर्णी उमेश सुतार महाराज श्री कबिर महाराज अशा नामवंत किर्तनकारांची किर्तनसेवा , दैनंदिन हरिपाठ,श्री हनुमान चालीसा पठण नामवंत कलाकारांची भजन सेवा हरि जागर, अन्नदान महाप्रसाद अशी आध्यात्मिक कार्यक्रमाची रेलचेल होत असून 2 एप्रिल रोजी ह.भ.प.श्री. भागवत महाराज कबिर पंढरपूर,संत कबीर महाराजांचे 17 वे वंशज यांच्या काल्याचे किर्तनाने सांगता होत आहे.
27 मार्च रोजी भूम येथीलअंबादास देशपांडे, संगीत विशारद, सेवानिवृत्त स्टेट बँक अधिकारी यांचा सुश्राव्य असा *अभंगवाणीचा कार्यक्रम* झाला. कार्यक्रमाची सुरुवात “जय रामकृष्ण हरी “ बिहाग रागात पारंपारिक भजनाने झाली.पंचपदीनंतर किरवाणी रागात “संतसंगतीचे काय सांगु सुख “ हा संत नामदेव महाराजांच्या अभंगाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. “ ज्ञानाचा सागर “ हा संत जनाबाईचा अभंग “घेई घेई माझे वाचे“ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग तसेच भक्तीगीत नाट्यगीतांने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.शेवटी “ शेवटची विनवणी “ या संत तुकाराम महाराजांचा अभंग भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. गायनाची साथ श्री.दत्ता गोळे ,ह.भ.प.श्री.विलास महाराज ,ह.भ.प.उमेश महाराज यांनी तर तबला साथ बाळासाहेब चव्हाण, उल्हास जवाहिरे,बापू पौळ, बप्पा जोशी यांनी केली. सप्ताहाचे यशस्वीतेसाठी सर्व हनुमान सेवेधारी परिश्रम घेत आहेत.
