भूम (प्रतिनिधी)- जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था व मोरे हॉस्पिटल समर्थ नगर भूम व साई क्लीनिकल लॅब भूम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सवलतीच्या दरात रक्त तपासणी शिबिरात उत्तम प्रतिसाद लाभला.
145 लाभार्थ्यांनी ह्या संधीचा लाभ घेतला. डॉक्टर प्रदीप मोरे यांनी आरोग्य बाबत मार्गदर्शन केले. यानंतर सुद्धा आरोग्याच्या बाबतीत वेगवेगळी शिबिर वेळोवेळी आयोजित केले जातील असे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शारदा प्रदीप मोरे यांनी सांगितले. साई क्लिनिकल लॅब व मोरे हॉस्पिटल मधील स्टाफ यांचे सहकार्य लाभले.
