तुळजापूर, - तीर्थक्षेत्र तुळजापूर येथून अक्कलकोटकडे जाण्यासाठी हंगरगा पाटी–मंगरूळ–इटकळ मार्ग तीर्थक्षेत्र  अक्कलकोटहा भाविकांसाठी अधिक सोयीचा व वेळेची बचत करणारा ठरत असल्याने हा रस्ता दोन पदरी करण्याची मागणी जोर धरत आहे. उर्वरित सोलापूर उमरगा नळदृग महामार्गावरून जाण्यास अक्कलकोट ला जाण्यासाठी रस्ता आहे मात्र तीर्थक्षेत्र तुळजापूर ला आलेल्या भाविकांसाठी मंगरूळ इटकळ अक्कलकोट हा मार्ग अधिक सोयीचा आहे या रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरी जमिनी देण्यासह यापूर्वी तयार होते 

या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून दररोज सुमारे ६ते ८हजार भाविकांचे  वाहने ये-जा करत आहेत. तुळजापूरहून नळदुर्गमार्गे अक्कलकोटला गेल्यास सुमारे १५ किलोमीटर अंतर अधिक पडते तसेच . भविष्यात  टोलही भरावा लागण्याची शक्यता आहे . तुळजापूर हंगरगा पाटी–मंगरूळ–इटकळ मार्गाने अक्कलकोटकडे गेल्यास अंतर कमी पडते. त्यामुळे वेळ, इंधन आणि खर्चाची मोठी बचत होत असल्याने वाहनचालक व भाविक या मार्गाला मोठी पसंती देत आहेत.

विशेष म्हणजे तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर आणि अक्कलकोट या प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग बनत आहे. सध्या अनेक भाविक तुळजापूर–पंढरपूर–गाणगापूर असा प्रवास करताना या मार्गाचा वापर करत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.

दरम्यान तुळजापूर ते , हंगरगा पाटी हा आधीच रस्ता मोठा आहे आता हंगरगा पाटी मंगरूळ व पुढे इटकळपर्यंतचा रस्ता दोन पदरी केल्यास या परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे   विशेष म्हणजे तीर्थक्षेत्र तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील तीर्थक्षेत्र अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेही हे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भाजपा पक्षाचे आमदार आहेत  अक्कलकोट भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी तुळजापूर तालुक्याच्या सर्दी पर्यंत रस्ता मोठा करून ठेवला आहे मात्र तुळजापूर तालुक्यातूनच तो मोठा नाही  सदरील रस्ता रुंदीकरण झालास तीर्थक्षेत्र तुळजापूर ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट हा शॉर्टकट रस्ता होणार आहे  यामुळे इंधन बचत होणार आहे या मार्गावर प्रचंड वाहतूक वाढणार आहे याचा फायदा तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसायासाठी होणार आहे 

 
Top