धाराशिव (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील कचरु मल्हारी सगट यांच्यावर राजकीय द्वेष व सूडबुद्धीने केलेली हद्दपार (तडीपार) ची कारवाई रद्द करण्यात यावी. संबंधित पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधित दोषीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.2 मार्च रोजी धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी यांना तर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्याशी चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, तुळजापूर नाका येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापासून निघालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात महिला व पुरुष शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

दिलेल्या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील कचरु मल्हारी सकट यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना (ठाकरे) च्यावतीने लढवली. त्याचा राग मनात धरून व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून द्वेष व सूडबुद्धीने सगट यांची ज्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झालेली आहे, ते आणि इतरांच्या नावावर असलेले गुन्हे त्यांच्या नावे दाखवून ते गुन्हेगार असल्याचे बसविण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे त्यांना धाराशिव सहज जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्याची कारवाई केली आहे. ही कारवाई अत्यंत चुकीची व अन्यायकारक आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी कोणाच्यातरी दबावाला बळी पडून सगट यांच्यावर राजकीय द्वेष व सूडबुद्धीने केलेली मातंग समाजातील सगट यांच्याविरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव यांनी दि.13 जानेवारी रोजी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 अन्वये तीन जिल्ह्यांमधून हद्दपार तडीपार करण्याचा आदेश पारित केलेला आहे. या हा आदेश देताना त्यांच्या विरोधातील अनेक न्यायालयामार्फत निकाली निघालेले असून सध्या त्यांच्याविरुद्ध कोणताही गंभीर स्वरूपाचा कायदा व सुव्यवस्था बिघडणारी परिस्थिती अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांच्यावर हद्दपारची कारवाई करण्यात आलेली असल्यामुळे मातंग समाजामध्ये तीव नाराजी निर्माण झाली आहे. ही कारवाई वस्तुस्थिती, सामाजिक परिस्थिती व न्यायनिष्ठ तत्वांचा विचार न करता करण्यात आलेली आहे. सगट यांच्या सामाजिक, कौटुंबिक व उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे असे समाजाचे मत आहे. त्यामुळे या आदेशाचा पुनर्विचार करून न्याय दृष्टिकोनातून हद्दपार (तडीपार) आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा. अन्यथा सकल मातंग समाजाच्यावतीने शासन व प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या आंदोलनात सुदर्शन रणदिवे, सुधाकर पाटोळे, लक्ष्मी गायकवाड, अशा पात्रे, वंदना रणदिवे, मनीषा गायकवाड, आकाबाई भोवाळ, सुमित पाटोळे, रोहित पंखे, सुरेश भिसे, महेश डोलारे, शिवाजी गायकवाड, सोमनाथ कांबळे, संदीप शिरसाट, संतोष मोरे, रवींद्र मिसाळ, बापू मिसाळ, गोविंद गायकवाड, संकेत कांबळे, सर्जेराव गायकवाड, बजरंग देडे, मारुती वाघमारे, विशाल पारधे, सर्जेराव गायकवाड, बाबा वाघमारे, तानाजी आडसोळ, राहुल ताटे, खंडू शिंदे, अमोल कांबळे, ओमकार कांबळे, गोरोबा ताटे, अक्षय वाघमारे, सर्जेराव शिंदे, बळीराम ताटे, बालाजी कांबळे, ओमकार पेठे, संभाजी कांबळे, कुमार शिंदे, साहिल लोंढे, अनिल शिंदे, फुलचंद शिंदे, विजय शिंदे, अरुण कांबळे, राम ताटे, बालाजी साळुंके, पंकज सोनपारखे, पुरुषोत्तम भिसे, कृष्णा क्षिरसागर, अक्षय क्षिरसागर, पुष्पक कसबे, धीरज भालेराव आदींसह शेकडोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाला होता.


 
Top