धाराशिव (प्रतिनिधी)- मेरा युवा भारत कार्यालय व छत्रपती क्रीडा मंडळ,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी आदित्य पाटील (कार्यकारी अधिकारी,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,धाराशिव) होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून अक्षय बिराजदार (तालुका क्रीडा अधिकारी) उपस्थित होते. मार्गदर्शन वक्ते म्हणून विश्वास खंदारे (तालुका क्रीडा अधिकारी,धाराशिव) तसेच मेरा युवा भारत कार्यालयाचे वैभव लांडगे, रविकांत सुरवसे, रोहिले गोविंद, ऋतुराज आगळे व छत्रपती क्रीडा मंडळाचे प्रा.प्रवीण बागल, रोहित चव्हाण, सुनील मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदित्य पाटील यांनी युवकांना मोठ्या संख्येने क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करण्याचे व देशाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले. त्यांनी क्रीडा क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन युवकांनी आपले भविष्य घडवावे, असेही सांगितले. या स्पर्धांमध्ये उमरगा,लोहारा,भूम व परंडा तालुक्यांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. खो-खो, कबड्डी,100 मीटर धावणे,गोळा फेक, लांब उडी व स्लो सायकलिंग अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे 200 ते 250 खेळाडूंनी आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत कापसे व सिद्धेश्वर मते यांनी केले.हा कार्यक्रम उपसंचालक, मेरा युवा भारत,धाराशिव (महाराष्ट्र-गोवा) राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
