परंडा(प्रतिनिधी)- आज दिनांक 6 मार्च रोजी परंडातालुक्यातील दिव्यांग व्यक्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांगाना प्रमाणपत्र मिळावे , दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबावी, दिव्यांग सेवा तालुक्यात मिळाव्यात या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूह या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून परंडा शहर व तालुक्यातील दिव्यांग तपासणी शिबिर दिव्यांग अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.
त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी परंडा उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले यामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग 32 मतिमंद दिव्यांग 15 अंध दिव्यांग 8 अशा एकूण 55 दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या
तपासणीसाठी धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर सुहास शिंदे , डॉक्टर पवन महाजन ,डॉक्टर विनोद बर्वे यांनी कामकाज पाहिले यावेळी परंडा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अधिकारी यांनी सहकार्य केले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग भाजपा आघाडी तालुकाध्यक्ष तानाजी घोडके, उत्तम शिंदे दिव्यांग उद्योग समूह तालुका अध्यक्ष तानाजी सांगडे , शहराध्यक्ष गोरख देशमाने पत्रकार फारुख शेख व इतर पदाधिकारी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
