काटी (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराचा ऐतिहासिक आणि मंगलमय कळसारोहण सोहळा 19 आणि 20 मार्च 2026 या दोन दिवस चाललेल्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात भाविक, माहेरवाशिणी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.अत्यंत शाही थाटात संपन्न. या सोहळ्या दरम्यान संपूर्ण काटी गावातील वातावरण धार्मिक बनले होते.
सोहळ्याची सुरुवात गुरुवार, 19 मार्च रोजी चिरंजीव सार्थक बावीकर आणि टीम यांचा सायंकाळी 7 वाजताभक्तीरंग हा सुरेल गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. चिरंजीव सार्थक बावीकर व त्यांच्या टिमने सादर केलेल्या सुमधुर भजनांच्या स्वरांनी भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते. शुक्रवारी दि.20 मार्च रोजी पहाटे 6 वाजल्यापासूनच धार्मिक विधींना प्रारंभ झाला. यामध्ये देवांना रुद्राभिषेक आणि वेदमंत्रोच्चारात कळस पूजन करण्यात आले.
भव्य कलश व दिंडी मिरवणूक: सकाळी 9 ते 11 या वेळेत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण भजन गायन व टाळ मृदंगाच्या गजरात माहेरवाशिणी डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर सकाळी 11 वाजता ह.भ.प. सुनिल महाराज ढगे यांचे कीर्तन सोहळा संपन्न झाला. हभप सुनिल ढगे महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील कलशारोहण महत्त्व सांगताना सांगितले की, कुठल्याही मंदीराला कळस असल्याशिवाय मंदीर परिपूर्ण होत नाही. आजचा सर्वांच्या उपस्थितीत होणारा हा कलशारोहणाचा सोहळा हा ऐतिहासिक क्षण असून या भैरवनाथ जोगेश्वरी मंदीराच्या जिर्णोद्धाराचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू असून प्रशांत कुलकर्णी काटीकर यांच्या मुख्य संकल्पनेतून येथील रहिवासी असलेले परंतु नौकरी निमित्त पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी विविध ठिकाणी स्थलांतरित झालेले कुलकर्णी परिवारातील सदस्यांनी या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सामुहिक रित्या एकत्रितपणे येऊन स्वइच्छने सामुहिक वर्गणी गोळा करून काटी नगरीत भव्य अशा भैरवनाथ मंदीराची उभारणी केली. हे काम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आपल्या बहारदार शैलीत किर्तनातून सांगितले. त्यांनी आपल्या किर्तनातून कलशारोहण रोहनाचे चार प्रकार सांगितले.
दुपारी 12 वाजता प्रांत प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगिरी प्रांतचेश्री स्वप्निलजी चामणीकर यांचे विशेष प्रबोधनपर संशोधनातून हिंदू धर्माविषयी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दुपारी 12:30 वाजता प्रमुख अतिथी प्रांत प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगिरी प्रांतचे स्वप्निलजी चामणीकर यांच्या हस्ते हस्ते मुख्य महाआरती होऊन कळसारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दुपारी 1 ते 3 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाच्या वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. माहेरवाशिणीं व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आगळावेगळा सन्मान काटी गावच्या लेकी-सुनांसाठी हा सोहळा जिव्हाळ्याचा विषय ठरला होता. मंदिर समितीने लग्नानंतर सासरी गेलेल्या माहेरवाशिणींना खास निमंत्रित केले. या सर्व महिलांना श्री भैरवनाथ जोगेश्वरीची प्रतिमा आणि साडी-चोळीचा आहेर देऊन सन्मानित करण्यात आले.
तर याच कार्यक्रमात भैरवनाथ जोगेश्वरी मंदीर ट्रस्टच्या वतीने प्रमुख अतिथी प्रांत प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगिरी प्रांतचे स्वप्निलजी चामणीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभागाचे प्रचारक श्री मंगेशजी बडवे, नवनिर्वाचित तुळजापूर पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख, नवनिर्वाचित काटी जिल्हा परिषद गटातील सदस्या सौ. आशाताई ब्रम्हदेव (बाळासाहेब) भाले, सरपंच सौ. आशाताई सुजित हंगरगेकर, पत्रकार उमाजी गायकवाड, हभप सुनिल ढगे महाराज,माजी जिल्हा संघचालक, धाराशिव ॲड. रविंद्र कदम,सुहास पुरुषोत्तम कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्काराने सन्मानित करण्यात आले.

