तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आलियाबाद येथे बंजारा समाजातील पारंपारिक होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
होळी सण म्हणटले की बंजारा समाजाची एक पारंपारिक पद्धतीने आगळी वेगळी प्रथा आहे. होळी आली की बंजारा बांधव वीस ते पंधरा दिवसांपासून एकत्रित येऊन मंदिरा समोर नाचत,गाणे म्हणत, लेंगी म्हणतात आणि ज्यांच्या घरी लहान मुल जन्माला येते त्याच्या घरी धुंड (बारसा) आयोजित केला जातो. आलियाबाद येथे संदीप धनाजी राठोड यांच्या मुलाचे धुंड (बारसा) करण्यात आला. येथील पाच बंजारा महिला व भाजपचे प्रदेश सदस्य नितीन काळे, नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, श्रीनिवास पाटील, यांच्या हस्ते हंड्याचे पुजन करण्यात आले.
यावेळी बंजारा होळी व धुंड विषयी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांनी माहिती दिली.यानतंर नाच, गाण्यात मदमस्त होऊन महिला, पुरुषानी लेंगी गीते सादर केले. यावेळी पुरुष मंडळींनी तेथील हंडा काढण्याचा प्रयत्न करतात पण महिलांनी पुरूषांना खुप लाकडाने मारहाण करतात. अशी वेगळी होळी व धुंड बंजारा समाजाची संस्कृती परंपरा आजही चालू आहे.
या कार्यक्रमासाठी उपसरपंच अमृता चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, शिवाजी राठोड, विनायक चव्हाण, पांडुरंग चव्हाण ,नेमिनाथ चव्हाण,डॉ गणेश राठोड, विलास राठोड शिवाजी चव्हाण, सुभाष नाईक, लक्ष्मण राठोड, दामाजी राठोड,बाबु नाईक,माणिक राठोड, गणेश चव्हाण,सिद्राम पवार, सुभाष चव्हाण, व्यंकट राठोड, हरीदास राठोड, यशवंत राठोड, गणपती राठोड,बाबु जाधव, हरिदास चव्हाण, मोतीराम राठोड,अरूण चव्हाण, बाबुराव चव्हाण, गुरूदेव राठोड ,हरी राठोड यांच्या सह आलियाबाद रामतीर्थ, येथील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
