धाराशिव (प्रतिनिधी)- आपल्या धाराशिव तालुक्यातील पळसवाडीची कन्या प्रगती बाबुराव कोळगे हिने जब्राट चित्रपटाची कथा - संवाद - दिग्दर्शन अभिनय केलेला चित्रपट प्रदर्शित झाला असून तो आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणून राष्ट्रीय पातळीवर कलाकारांचे संघटन असलेली धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्या दैनंदिनी देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी देवगिरी प्रांत दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, सोहळा सिल्क चे मालक तथा उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, संस्कार भारतीचे कलासाधक गायक अक्षय भन्साळी,सीए मोहसीन शेख उपस्थित होते. लोककला लावणी नृत्य लोपपावत असून समाजातील लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यात बदल होण्याची गरज आहे हा विषय जब्राट चित्रपटात उत्तम मांडला आहे. तर हा चित्रपट आपल्या भूमिकन्येचा प्रगतीचा असुन चित्रपट आपण सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन  पाहावा असे मनोगत श्यामसुंदर भन्साळी यांनी केले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top