तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग, अक्कलकोट रस्ता संपादनाबाबत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत संपादन प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या अधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यात यावी यासाठी शेतकरी संघर्ष समितीचे हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय क्रॉग्रेस महाराष्ट्र याना तुळजापूर येथे शेतकरी न्याय हक्क यात्रेच्या निमित्ताने आलेले हर्षवर्धन सकपाळ यांना निवेदन देवुन या निवेदनात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग-अक्कलकोट रस्ता बाधित क्षेत्र संपादन करण्याचे आदेश मुबंई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने आदेश दिलेले आसताना शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनी या मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सहा व सोलापूर जिल्ह्यातील सात गावची संयुक्त मोजणी जिल्हाधिकारी धाराशिव व सोलापूर यांच्या देखरेखेखाली करण्यात येऊन या मोजणीत बाधित झालेले क्षेत्र संपादन करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आसताना यात जाणिवपुर्वक दिरंगाई केली जात आसल्याने दिरंगाई करणाऱ्या संबधित अधिकारी याच्या वरती करवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर व धाराशिव याना पत्र देवुन शेतकऱ्यांनरती आन्याय करणाऱ्या अधिकारी यांच्या वरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आसे निवेदन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले यावेळी दिलीप जोशी, सरदारसिग ठाकुर, व्यकट पाटील, पंडीत पाटील, गुलाब शिदे, अजमोददीन शेख, बालाजी ठाकुर, लक्ष्मण निकम, काशिनाथ काळे, बंडु मोरे, श्रीकात पोतदार, दशरथ सिग ठाकुर, आकाश निकम, दत्ता निकम ईत्यादी शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

 
Top