तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील निलेखन न करताच समाजमंदिर पाडणा-यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अमोल कसबे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,तेर येथील लहुजीनगर येथील मध्यवर्ती मातंग समाजमंदिर हे ग्रामपंचायत कार्यालय व शासनाच्या माहीतीत असतानाही कोणताही निलेखन ठराव न करता ,वरीष्ठ अधिकारी यांची परवानगी न घेता सदर समाजमंदिर पाडण्यात आले आहे.या समाजमंदिरावर तीन ते चार महिन्यांपूर्वी पंचेविस ते तीस हजार रुपये दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आलेले आहेत.ही बाब गंभीर असून ग्रामपंचायत अधिनियम व नियमांचे उल्लंघन आहे.सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आहे.अनुसुचित जाती वस्तीतील समाजमंदिर पाडण्याने एस.सी/एस टी (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम लागू होण्याची शक्यता आहे.या प्रकरणी सदर पाडकामाची चौकशी करून दोषी संबंधित व्यक्ती विरूद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्याची मागणी तेर ग्रामपंचायतचे सदस्य अमोल कसबे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी,मुख कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी,तेर ग्रामपंचायत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


 
Top