तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील नारायण साळुंके हे पायाने दिंव्यांग आहेत. सामाजिक कार्य करणारे नारायण साळुंके यांना तीन मुली असुन त्यांना आतिशय कष्टाने शिक्षण देत आहेत.त्यांची मोठी मुलगी कु.तनुजा ही फिजीओ थेरपी वैद्यकीय शिक्षणासाठी माजलगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात मध्ये शिक्षण घेत आहे. तीची फि एक वर्षासाठी 3 लाख 70हजार आहे.दुसरी मुलगी 9वीला आहे तिसरी मुलगी 7वी ला आहे. त्यांचा शिक्षणाचा खर्च खूप आहे.
माजलगाव येथे मुलीला भेटण्यासाठी पाच दिवसांपूर्वी नारायण साळुंके आणि त्यांची पत्नी रेश्माताई साळुंके हे माजलगावला जात असताना त्यांना तेलगाव या ठिकाणी एका गरिब ऊसतोड कामगार असलेल्या महीलेचे दोन तोळा सोन असलेले गंठन सापडले .ते कुटुंब मुलीला भेटुन परत आले
आणि ज्या ठिकाणी गंठन सापडले तिथे विचारपूस केली येथे कोणाचे सोन्याच गंठण हरवल आहे का? अशी विचारपूस केली.त्यावेळी नारायण साळुंके यांना समजले की, या गावात अंजना अंगत गायकवाड या गरिब महीलेच सोन्याचे गंठण हरवल होत.ती महीला सकाळपासुन रडत आहे.नारायण साळुंके आणि त्यांच्या पत्नीने ते सोन्याचे गंठण घरी जाऊन अंजना गायकवाड यांना जाऊन दिले.अंजना गायकवाड खुश होऊन आगदी गळ्यात पडुन रडली.या जगात माणुसकी जीवंत आहे.खुप अडचणीत मुलींना नारायण साळुंके शिक्षण देत आसताना दोन तोळे सोन्याचे गंठण परत देण म्हणजे खुप मोठा प्रामाणिकपणा आहे.सापडलेल सोन परत देण्यासाठी नीतीमता चांगली पाहिजे.आणि ती नीतीमत्ता नारायण साळुंके आणि त्यांच्या पत्नीने सांभाळली आहे.नारायण साळुंके यांच्या सारख्या प्रामाणिक माणसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.रस्त्यावर सापडलेले दोन तोळे सोन्याचे गंठण ज्यांचे आहे त्यांना परत करणारे नारायण साळुंके यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
