तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी उत्पत्ती दिन गुरुवार दि. 26 मार्च रोजी तुळजापुरात साजरा करण्यात आला. आज श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा उत्पत्ती दिन (प्रकट दिन) निमित देवीजीस अभिषेक व महाआरती नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या हस्ते पार पडली.
यावेळी जनकल्याणासाठी देवीसमोर प्रार्थना करण्यात आली. प्रकट दिनानिमित्त महाद्वारासमोर भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महंत वाकोजी बुवा, तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने, धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, नागेश शितोळे, नागेश नाईक, किशोर गंगणे गोविंद खुरुद,
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच बाळासाहेब भोसले, इंद्रजीत साळुंके, आदींसह शहरातील नागरिक, व्यापारी, पुजारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
