धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील बार्शी नाका (जिजाऊ चौक) ते बोबले हनुमान चौकापर्यंतच्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. ते काम सुरु करावे या एकमेव मागणीसाठी दिनकर उर्फ दादासाहेब वसंतराव मुंडे यांनी दि.२५ फेब्रुवारीपासून त्याच रस्त्यावर रस्त्यावरच सुरू केलेले आमरण उपोषण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी फोनवर दिलेले आश्वासन, नगराध्यक्ष नेहा काकडे व नगर परिषदेचे बांधकाम सभापती अभिजीत काकडे तसेच मुख्याधिकारी यांनी तीन महिन्यात काम करणार असल्याचे दिलेल्या लेखी आश्वासनानंतर ते आमरण उपोषण पाचव्या दिवशी रविवार दि.१ मार्च रोजी स्थगित करण्यात आले. दरम्यान, नगरपलिका प्रशासनाचे
उप मुख्याधिकारी गोरे, बांधकाम सभापती अभिजित काकडे, नगरसेवक राहुल काकडे, सुजित साळुंके यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हस्ते नारळ पाणी घेतले.
धाराशिव शहरातील बार्शी नाका (जिजाऊ चौक) ते बोंबले हनुमान चौक या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फुफाटा साचला असल्यामुळे या भागातील नागरिकांना जाण्या येण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. तर धूळ उडत असल्यामुळे श्वसनाचे व इतर आजार जडले व जडत आहेत. तसेच वाहन चालकांना तर आपला जीवच मुठीत घेऊन आपली वाहने चालवावी लागतात. विशेष म्हणजे या रस्त्यावर शैक्षणिक संकुले असल्यामुळे विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, या रस्त्यावर वारंवार छोटे-मोठे अपघात होऊन अनेकजण जायबंद झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरु करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी वारंवार नगर परिषद प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्याकडे लेखी व तोंडी केली. परंतू, रस्त्याचे काम करू असे आश्वासन देण्यापलीकडे कुठलीही कारवाई झाली नाही. दरम्यान, बस स्थानक ते हनुमान चौक मार्गे बार्शी नाका या रस्त्याचे काम सद्या चालू आहे. ते काम बाशा नाका (जिजाऊ चौक) ते बोंबले हनुमान चौकापर्यंत करण्यात यावे अशी मागणी मुंडे यांनी लावून धरली. त्यांनी यासाठी मुख्याधिकारी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी स्वरूपात केली. मात्र, याबाबत कोणतेही उत्तर दिले गेले नाही. शिवाय दंडनाईक यांच्या घरापर्यंत काम करण्यासाठी त्याची खोदाई करण्यात आली. पुढील कामाबाबत विचारले असता तो मंजूर नसल्याचे सांगितल्यामुळे मुंडे यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाची दखल भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेऊन मुंडे यांना फोनवर संपर्क साधून हा रस्ता येत्या दोन महिन्यांमध्ये करून घेण्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून घेऊ असे आश्वासन दिले. तर मुख्याधिकारी, नगराध्यक्ष नेहा काकडे व नगर परिषदेचे बांधकाम सभापती काकडे यांनी देखील नगर परिषदेचे अधिकारी यांच्यासह उपोषण स्थळी दि.१ मार्च रोजी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना लेखी स्वरूपात ठोस आश्वासन दिले. त्यांनी केलेल्या विनंतीला मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुरू केलेले आपले उपोषण पाचव्या दिवशी नारळ पाणी घेऊन स्थगित केले. यावेळी डॉ संतोष मुळे, डॉ दत्ता बुर्ले, डॉ सुभाष वाघ,आबा मुंडे, चंद्रजित जाधव, शीतल देशमुख,, मोहन मुंडे, प्रमोद देशमुख, नानासाहेब बोराडे, प्रितम मुंडे, कृष्णा मुंडे, रवींद्र अंबुरे, पांडुरंग लाटे, बापू खुणे,अशोक उंबरे, सुनील पंगूडवाले, विश्वजित देशमुख, बुबा उंबरे, दादा पाटील, तानाजी माने, बालाजी सुरवसे, दत्ता शेवाळे, बिरू ढगारे, गणपत घोडके, रामा पिंगळे, विजय धोंगडे, संभाजी आहेर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
