परंडा (प्रतिनिधी)-येथील सदगुरू यज्ञेश्वर शिवाचार्य (वेडे महाराज ) यांच्या २२६ व्या पुण्यतिथी निमित्त सदगुरू राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पुण्य नगरीमध्ये येथे उज्जैयीनी सधर्म पीठ (कर्नाटक ) जगदगुरु यांची उपस्थिती लाभणार असून अखंड शिवनाम सप्ताह, परमरहस्य ग्रंथाचे पारायण, संगीतमय शिवपाठ, किर्तन भजन,रथोत्सव,धर्मसभा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.
परंपरे प्रमाणे येथील भोत्रा रोड मठात वेडे महाराज यांची २२६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. यात बुधवार दि ४ मार्च २०२६ ते शनिवार ७ मार्च २०२६ या कालावधीत विविध भक्तीमय कार्यक्रम होणार असून यात ४ ते ६ मार्च दरम्यान किर्तन भजन शिवपाठ महाप्रसाद जागर तर दि ७ मार्च शनिवार रोजी पुण्यतिथी दिवशी सकाळी ८ ते ११ श्री श्री श्री १००८ जगदगुरु सिध्दलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैयिनी सधर्म (कर्नाटक ) यांचा भव्य दिव्य रथोत्सव छत्रपती शिवाजी चौक( कोर्ट) ते वेडे महाराज मठ भोत्रा रोड पर्यंत होणार आहे .व नंतर धर्मसभा होणार आहे.
सकाळी आठ वाजता गुरुगादीस रुद्राभिषेक बिल्वार्चन महापुजा व महाप्रसाद होणार आहे. या अभुतपुर्व सोहळ्यासाठी श्री वेदांताचार्य मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज (वेळापुर), सिध्दलिंग राज गुरु शिवाचार्य महाराज (शिंगणापूर), डॉ निळकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर), शिवानंद शिवाचार्य महाराज (वाळवा), वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज (वसमत), प्रभुदेव शिवाचार्य महाराज (माढा), वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज (मानुर), महादय्या रविशंकर शिवाचार्य महाराज(रायपाटण), आदी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व समाजतील तमाम भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसाराचा लाभ घ्यावा असे आवाहन परंडा शहर व ग्रामस्थ शिष्य परिवार वर्ग यांनी केले आहे.
%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%80.jpg)