धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‌‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा‌’ आयोजित करण्यात येत आहे.

याच अनुषंगाने शुक्रवार,13 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मॉडेल करिअर सेंटर धाराशिव आणि शिक्षणमहर्षी गुरुदेव आर.जी.शिंदे महाविद्यालय अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र,परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी गुरुवर्य आर.जी.शिंदे महाविद्यालय, परंडा येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ‌‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा‌’ आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर,धाराशिव,बार्शी व परंडा येथील विविध आस्थापना सहभागी होणार असून त्या सुमारे 210 पदांसाठी उमेदवारांची निवड करणार आहेत.तसेच मेळाव्यात उपस्थित उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. तरी या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्यात जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी सहभागी व्हावे,असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02472-299434 वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


 
Top