धाराशिव  (प्रतिनिधी)- दाभा (ता. कळंब, जि. धाराशिव) येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी व विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा या उद्देशाने ही शाखा सुरू करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, कॅबिनेट मंत्री) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर संघटितपणे लढा देण्याची गरज अधोरेखित केली व शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास मयूर ज्ञानेश्वर काकडे (जिल्हाध्यक्ष), बाळासाहेब पाटील, गणेश शिंदे, नागनाथ माळी, रामहरी शिंदे  व गणेश टेळे (शाखाध्यक्ष) यांचा समावेश होता. उपस्थित सदस्यांमध्ये वैजनाथ टेळे, उत्तम शिंदे, जाधव विशाल, विश्वभर प्रम्हाद, विठ्ठल कदम, गोविंद टेळे, रमेश लोंढे, बाबुराव एकनाथ टेळे, बंकट रंगाश पांसल, तसेच इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाखेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. शाखाप्रमुख म्हणून प्रकाश टेळे, उपाध्यक्ष म्हणून महादेव टेळे, कोषाध्यक्ष म्हणून दिगंबर साबळे, सचिव म्हणून अनिल टेळे व महिला सचिव म्हणून अनिता टेळे यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करत राहण्याचा संकल्प करण्यात आला. नव्याने सुरू झालेली ही 124 वी शाखा परिसरातील दिव्यांग बांधवांसाठी शासकीय योजना, मार्गदर्शन व सहाय्य मिळविण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 
Top