मुरूम (प्रतिनिधी)- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना मुरूम येथील उत्पादन विभागात कामावर असलेले कर्मचारी कै.महादेव शिवप्पा लामजने यांचे अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचे वारस पत्नी श्रीमती रेखाबाई महादेव लामजने यांना श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्याकडून 10लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी कारखान्याचे संचालक माणिकराव राठोड, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाने, चीप अकाउंटंट देशमुख, शरणप्पा कबाडे,संजय आमाशेट्टे ,केन अकाउंटंट राजेंद्र पाटील, सहाय्यक इंजिनिअर हेंडले, आदी उपस्थित होते.
