कळंब (प्रतिनिधी)-  पवित्र महाशिवरात्री निमित्त शहरातील श्री स्वामी समर्थ गोशाळा येथे गाईंना गुळ व पशुखाद्य खाऊ घालून भक्तिभावाने सण साजरा करण्यात आला.

महाशिवरात्रीच्या दिवशी गोसेवा करणे ही भारतीय परंपरेतील महत्त्वाची भावना मानली जाते. याच भावनेतून गोशाळेत उपस्थित भाविकांनी गाईंना गुळ, चारा व पशुखाद्य देत सेवा केली. या उपक्रमामुळे परिसरात धार्मिक व उत्साही वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अनेकांनी “सेवेतूनच शिवभक्ती” हा संदेश देत समाजात दयाभाव आणि प्राणीसंवर्धनाची जाणीव वाढवण्याचे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे सण साजरा करण्यासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीवही अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 
Top