उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरातील रोटरी क्लब च्या वतीने गरजू लोकांसाठी शीतशवपेटी उपलब्ध सोमवार दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी करून देण्यात आली आहे. याचा लोकार्पण सोहळा डॉ. पोफळे हॉस्पिटल मध्ये पार पडला. 

रोटरी क्लब उमरगा परिवाराच्या वतीने प्रत्येक समाजातील गरजू कुटुंबासाठी कठीण परिस्थितीमध्ये वेळेअभावी प्रेत ठेवावे लागते मात्र ठेवण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळेस अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते याचा विचार करून आपल्या परिसरातील लोकांची ही समस्या सोडविण्यासाठी समाज उपयोगी कार्य म्हणून आपल्या उमरगा रोटरी क्लबने रोटरी ऑफिस कडून समाज सेवाभावी संस्थेकडून एक शीतशवपेटी उपलब्ध करून घेतली आहे. ज्याचा फायदा आपल्या परिसरातील प्रत्येक समाजातील कुटुंबासाठी होणार आहे.

समाजातील प्रत्येक बांधवांनी हा संदेश आपल्या गावागावापर्यंत पोहोचवावा ज्यांना कुणाला याची आवश्यकता असेल त्यांनी कोणत्याही रोटरी बांधवाला किंवा ही शीत शवपेटी सध्या ज्या संस्थेकडे स्वाधीन केली आहे म्हणजे वीरशैव लिंगायत समाज संस्था उमरगा या संस्थेतील कोणत्याही सदस्यांना संपर्क करून आपण या पेटीचा उपयोग करून घ्यावा असे जाहीर आव्हान उमरगा रोटरी क्लबच्या वतीने करण्यात येत आहे.

रोटरीच्या 121 व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात सर्वप्रथम उमरगा रोटरी क्लबच्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक अध्यक्षाचा वर्धापन दिनानिमित्त सन्मान करण्यात आला तसेच भव्य असा शितशवपेटीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 

याप्रसंगी रोटरी क्लबचे सर्वात जुने अध्यक्ष तथा चार्टर मेंबर डॉ. मल्लिनाथ मलंग, तम्मा मामा माळगे, वाकडे व लिंगायत समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर रोटरी परिवाराचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.दीपक पोफळे यांनी या प्रोजेक्ट विषयी सर्वांना सविस्तर माहिती दिली. रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा.डॉ.धनंजय मेनकुदळे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन रोटे. परमेश्वर सुतार यांनी केले. तर आभार सचिव रोटे. प्रा.राजू जोशी यांनी मांडले. लिंगायत समाज संस्थेच्या वतीने प्रवीण माशाळकर यांनी उमरगा रोटरी क्लबचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी वीरशैव लिंगायत समाज संस्था या संस्थेचे पदाधिकारी व सदस्य तसेच उमरगा रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top