तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या गुणवंत चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी प्रदान केली 

तेर येथील वैष्णवी काकासाहेब देवकते, श्रुती गोरोबा सुतार, वैष्णव दत्ता बनसोडे व ओंकार राजेंद्र धुमाळ यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एमबीबीएस शिक्षणासाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा अर्चनाताई पाटील यांनी दिल्या होत्या. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.अर्चनाताई पाटील यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता करत या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची बक्षीस रक्कम प्रदान केली. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे आणि त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी यासाठी हा छोटासा प्रयत्न असून यापुढील काळातही शिक्षणाच्या प्रवासात कोणतीही अडचण आल्यास सदैव मदतीस तयार असल्याचा विश्वास यावेळी  व्यक्त करुन आपल्या भागातील विद्यार्थी डॉक्टर बनून समाजसेवेचे महान कार्य करतील अशी अपेक्षा अर्चनाताई पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

 
Top