तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील प्रेरणा सामाजिक संस्था संचलित लिटल फ्लावर्स स्कूल यांच्या वतीने तालुकास्तरीय जिजाऊ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
अर्चना रवींद्र अंबुरे, संध्या बाळकृष्ण शिंदे, अनिता बालाजी घोडके, उज्वला मोहन शिंदे, सविता सचिन कन्हेरे यांना मानपत्र व जिजाऊंची प्रतिमा ,शाल श्रीफळ देऊन पुरस्कार वितरण करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद ,विस्तार अधिकारी बापू शिंदे उपस्थित होते. प्रस्ताविक बाळासाहेब घेवारे यांनी केले. तर तर आभार तानाजी पिंपळे यांनी मानले.
