भुम (प्रतिनिधी)- गावातील तरुण मंडळी  एकत्र आल्यावर कोणतेही काम करु शकतात.शासनाच्या निधीतून अनेक काम होतात परंतु लोकसहभागातून हे सर्वात मोठं काम झाले आहे. यांच उदाहरण भूम तालुक्यातील डोकेवाडी गावात पाहवयास मिळालं आहे. या गावातील मागील दोन वर्षापासून सुशिक्षित , असे पंधरा नवंयुवक मंडळ एकत्र आले त्यांनी एक कमिठी स्थापन केली. या कलयुगात देखील तरुणांनी भक्ती मार्ग स्वीकारत गावातील अखंड हरिनाम सप्ताह ची सर्व सूत्रे हाती घेतले. दोन वर्षात अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून सर्व गावकरी मंडळ नोकरदार ,व्यापारी, शेतकरी, शेतमजूर यांना विश्वासात घेऊन लोक सहभाग जमा केला. त्या जमा झालेल्या लोकसभागातून गावचा दोन वर्ष अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न झाला. मागील 55 वर्षापासून गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. परंतु कोणत्याही प्रकारची नवीन घडामोड होत नव्हती म्हणून तरुण एकत्र आले व लोकसभागातून झाली नसल्याने तरुणांनी एकत्र येऊन गावांमध्ये खुले भव्य असे लोकसभागातून सभागृह उभारली आहे. या सभागृहामध्ये गावातील सामान्य कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्या धार्मिक कार्यासाठी विवाहासाठी उपयोगात येणार असल्याने गावकऱ्यांमध्ये एक उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे. असे तरुण एकत्र आले तर नक्कीच गावच्या विकासामध्ये भर टाकू शकतात अशीही चर्चा सर्वत्र आहे.शिल्लक रक्कम जिल्हा परिषद शाळेतील बहुतेक सुविधा साठी खर्च करावा ही मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. डोकेवाडी च्या  तरुणाचा आदर्श इतर गावातील तरुणांनी घ्यावा गावाच्या विकास कार्यात सहभागी व्हावे 


सन - 2024-2025 देणगी जमा 1008606-/ खर्च 686784 शिल्लक 3,21,822-/, सन 2025-2026 देणगी जमा 99,6685-/ खर्च 11,35469-/ एकूण शिल्लक 190,000-/ पुढील विकास कामासाठी नुतन कमिठीकडे जमा करण्यात आली.


“गावातील आम्ही  सुशिक्षित तरुण मंडळी एकत्र येऊन गावचा सप्ताह हाती घेतला आणि दोन वर्षात लोक सहभागातून भव्य खुले सभामंडप उभारण्यात आले.यासाठी सर्व गावकऱ्यांचे नौकरदार, व्यापार, शेतकरी, शेतमजूर सर्वांचे सहकार्य लाभले आहे“.

- महावीर जालन 

- (सप्ताह कमिठी सदस्य)


“ लोकसभागातून उभारण्यात आलेल्या खुल्या सभामंडपामध्ये  पहिला मान मला मिळाला असून माझ्या मुलीचा विवाह गुरुवारी  (ता.26) रोजी संपन्न झाला. यामुळे माझा कलामंडपसाठी लागणारा खर्च वाचला असून माझा  आर्थिक नुकसान टळले आहे.या तरुण  सप्ताह कमिटीने अत्यंत चांगले काम केले आहे“

- नारायण आहेर 

ग्रामस्थ , डोकेवाडी.

 
Top