मुरुम (प्रतिनिधी)- येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शिवजयंती निमित्त भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्षा अमोल शिवाजीराव मोरे आणि सहसचिव डॉ सुभाष वाघमोडे यांच्या हस्ते शिवरायांना अभिषेक पूजा आणि अभिवादन करण्यात आले. यावेळी वेषभूषा स्पर्धा आणि लाठी, काठी आणि दांडपट्टा सादरीकरण. वेषभूषा स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे सैनिक, तानाजी मालुसरे, संत समर्थ रामदास, इतर शिवकालीन व्यक्ती,
नागरिक यांच्या प्रतिमेचे हुबेहुब सादरीकरण केले.
आयन शेख याचा दांडपट्टा आणि लाठी-काठी सादरीकरणाचे कौतुक करण्यात आले. महाराजाच्या वेषभूषा प्रथम क्रमांक सुशिल सूर्यवंशी द्वितीय क्रमांक आरती सोनकांबळे, हर्षदा ममाले, अश्विनी पाटील, वैष्णवी काळे, आयन शेख आणि हर्षदा सूर्यवंशी दांडपट्टा विशेष पुरस्काराने सन्मानित तर दुसऱ्या गटात प्रतीक्षा दुरगुडे आणि. स्नेहा चौहान तसेच छोट्या जिजाऊं वेषभूषातील कु. तृप्ती नितीन कोराळे, आणि स्वाधिका बिराजदार यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व विजेत्यांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्राचे वाटप संस्थेचे सहसचिव डॉ सुभाष वाघमोडे, प्राचार्य डॉ संजय अस्वले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. पी. ए. पिटले पर्यवेक्षक शैलेश महामुनी यांची उपस्थिती होती. या उपक्रमांसाठी निमंत्रित मान्यवर, महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीं मोठया संख्येने हजर होते.
