वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित् वाशी व भूम तालुक्यातील विविध माध्यामिक व उच्च माध्यामिक विद्यालयात कर्मवीर मामासाहेबांचे विचार आजचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कळावेत म्हणून कर्मवीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्याचे सुरुवात अजिंक्य मा. व उच्च माध्यमिक शाळा वाशी येथून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक कदम यांच्या व्याख्यानाने झाली. याप्रसंगी संस्थापक व सेवा निवृत्त शिक्षक एस एल पवार अध्यक्षस्थानी होते. तर महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. प्राचार्य डॉ कदम सर यांनी मामांचे जीवन व त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकला. दुसरे पुष्प गुंफण्याचा योग प्रा शामसुं दर डोके यांना आला त्यांनी मौजे गिरवली ता भूम येथील लोकसेवा हायस्कूल मध्ये मामांचे विचार व त्यांचे विविध प्रसंग सांगून मामांचा संदेश विद्यार्थापर्यंत पोहोच विण्याचे काम केले याप्रसंगी संस्थापक व अध्यक्ष व्यंकटराव मोटे हे अध्यक्षस्थानी होते तर महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफण्याचे काम डॉ विश्वास चौधरी यांनी तेरखेडा येथील गणेश विद्यालयात केले तर अध्यक्षस्थानी कोकाटे सर उपमुख्याध्यापक होते तर वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते. व्याख्यानमालेचे चौथे पुष्प तेरखेडा येथील सुबोध विद्यालयात प्रा शामसुंदर डोके यांना गुंफण्याचा योग आला तर अध्यक्षस्थानी कुरवलकर सर होते. या उपक्रमासाठी प्राचार्य यांनी आठ टीम तयार केल्या आहेत.त्या टीम दोन्ही तालुक्यात जावून मामांचे विचार घेवून जाण्याचा संदेश दूत म्हणून काम करत आहेत .या उपक्रमाचे नियोजन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शामसुंदर डोके संयोजक म्हणून काम पहात आहेत.
