भुम (प्रतिनिधी)- संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिनांक 18 ्फेब्रुवारी 2026 रोजी अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिर नाशिक या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा लोक कलावंत पद्मश्री विजेते रघुवीर खेडकर, माजी मंत्री बच्चुभाऊ कडू, शेतकरी नेते रविकांत तुपकर, महिला आयोगाच्या सदस्या दुर्गा रुपवते यांच्या उपस्थित सामाजिक कार्याबद्दल संदीप राघवेंद्र बागडे यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी संदीप राघवेंद्र बागडे यांची भारतीय मानवाधिकार परिषदेवर राज्य मंडळ सदस्य म्हणून निवड झाली. त्याबद्दलही संजीवनी फाउंडेशनने सन्मानित केले. या कार्यक्रमासाठी श्री गुरुदेव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गायकवाड, एस. जी. गायकवाड, आर. यू. कोळी उपस्थित होते.
