भुम (प्रतिनिधी)-  छत्रपती मराठा सेना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आमदार तानाजीराव सावंत व मराठा ठोक मोर्चा समन्वयक तथा छत्रपती मराठा सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश डोंगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात स्वच्छता अभियान व शिवप्रसाद लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमात शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. स्वराज्य, शौर्य, न्याय आणि जनहित या मूल्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत पांडुरंग धस यांनी व्यक्त केले. या शिवजयंती कार्यक्रमाला बालाजी वारे धनंजय पाटील अजित पाटील अविनाश कोळेकर बळीराम वारे नितीन पाटील आदित्य घाडगे ज्ञानेश्वर माळी छत्रपती मराठा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी “जय शिवाजी, जय भवानी” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.


 
Top