धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजानी रयतेचे राज्य निर्माण केले असे प्रतिपादन हनुमंत गायकवाड यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने धाराशिव येथे नालंदा कॉलेज ऑफ फॅशेन डिझाईन या महाविद्यालयात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. रवी सुरवसे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हनुमंत गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षपदावरून बोलताना विजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, निष्कलंक चारित्र्य, त्यांची राजनीती, शाहिस्तेखान प्रकरण, अफजल खान प्रकरण, आग्रा प्रकरण, इत्यादी विषयी माहिती सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती लहानपणी माता जिजाऊ साहेब यांनी संस्कार केले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य निर्माण करू शकले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत मस्के यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारूती पवार यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. अंबादास कलासरे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी सदस्य मिलिंद जानराव, अमोल गडबडे, राजेंद्र धावारे, व धाराशिव नगरीतील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
