धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले व मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा म्हणून गणले गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कार वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने मराठी मातृभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मंडळाच्या वतीने यावेळी मराठी अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मंडळाने दहा बाय दहाच्या आकाराचे डिजिटल पोस्टर बनवून गणेशाच्या या मंडळाच्या रंगमंचकावर उभे करून सर्वांनी पाहून मराठी गौरव दिनाचे महत्त्व यातून पाहायला मिळाले या पोस्टर मध्ये मराठी भाषे चे सखोल व मजबूत पायाभूत लिखाण, मराठी माणसाने केलेले पुस्तके ,संतांनी मराठी मधून लिहिलेले ग्रंथ ,विविध समाज सुधारक ने लिहिलेले ग्रंथ,छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता, सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले मराठी बद्दलची आत्मीयता या पोस्टर मधून दाखवण्यात आलेली आहे .या पोस्टर मध्ये मराठीतील मुळाक्षरे ही एक वेगळ्या व आगळ्या आकर्षक पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषेला वंदन करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची मराठमोला वेशभूषा, व लाल भगव्‌‍ यारंगाच्या टोप्या घालून मराठी भाषेचे महत्व हजारो वर्षापासून जपली गेलेली भाषा आहे यातून आपले ज्ञान, विज्ञान व संस्कृती पारंपारिक परंपरेने जपली आहे अभिजात दर्जामुळे देश व विदेश पातळीवर महत्व वाढत आहे . ताशा व ढोल यांच्या आवाजाने  निनादाने मराठी भाषेला वंदन केले मराठी भाषेची अस्मिता व प्राचीनता व संस्कार व संस्कृती असणाऱ्या या भाषेचे महत्त्व मंडळाच्या लहान थोर सदस्यांनी विनम्रपणे वंदन करण्यात आले यावेळी प्राध्यापक गजानन गवळी, विद्या साखरे, विश्वास दळवी, वरून साळुंखे ,सुरवसे, मल्हार साखरे ,पाळणे, शिंदे, लाल्या चवडके, गोट्या, युवराज हूच्चे, शुभम जानगवळी, काशिनाथ दिवटे व भालचंद्र हुच्चे इत्यादीने आपले मराठी भाषेचे महत्व कमी न होता कसे जोपासना व वाढविणे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे की आजच्या काळाची गरज आहे असे व्यक्त केले

मंडळ विविध क्षेत्रात व विविध उपक्रमामध्ये समाज प्रबोधन व समाजहित, जनजागृती सेवा भावाने कार्यरत आहे .गेली 64 वर्षापासून मंडळांनी समाज प्रबोधनातून अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार , जुलूम ,जातिभेद धर्मभेद यास स्थान न देता निर्भय भारत अखंड भारत उद्देशाने कार्य करीत आले आहे यावेळी सर्वांचे आभार राजकुमार दिवटे यांनी मा मानले. श्री गणेश व श्री तुळजाभवानी मातेची आरती व पूजाविधि व पेढे वाटून कार्यक्रम संपन्न झाला .

 
Top