तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील नऊ खेळाडूंची राज्यस्तरीय सब ज्युनिअर फुटबॉल स्पर्धेत निवड झाली आहे ही स्पर्धा दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी नांदेड येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी धाराशिव येथे अंतिम निवड चाचणी पार पडले पडली. यामध्ये विद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थ्यांची उत्कृष्ट खेळाडू म्हणून राज्यसंघात निवड करण्यात आली. 

त्यामध्ये शिवम गोपाळ जाधव, मोहित चंद्रकांत कदम, जयराम बालाजी आगलावे, यशराज बाळू गडेकर, अभिनव राम सातपुते, प्रसाद भगवान जाधवर, श्रेयस दयानंद चव्हाण, आर्यन वैजनाथ चौधरी (सर्व  सहावी अ) प्रणव नागनाथ धावणारे, कृष्णा मिराजी मैदाड (7 वी) तसेच सीनियर गटामधून पार्थ गिरजप्पा शितोळे, प्रथमेश विभूषण साबळे, लांडगे समर्थ, विनोद सराव समर्थ नागनाथ (11 वी) सर्व यशस्वी खेळाडूंना श्रीमान रेनके सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व क्रीडा शिक्षकांचे ही मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्था तसेच विद्यालयाच्या वतीने प्राचार्य श्रीमान घोडके यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


 
Top